उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भाजयुमो युवती जिल्हासंयोजक  पुजा राठोड यांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता युवा मोर्चा  युवती आघाडी जिल्हा चिटणीस पदी ज्योती भुसारे, जिल्हा उपाध्यक्ष पदी स्वाती देडे, तुळजापूर युवती तालुकाध्यक्ष पदी श्रध्दा ठाकुर,  तालुका उपाध्यक्ष पदी प्रियांका कुलकर्णी तर  उस्मानाबाद शहरउपाध्यक्ष पदी प्रगती जहागीरदार हीची नियुक्ती करण्यात आली.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महिला मोर्चा आणि युवतींचे मजबूत संघटन होत आहे आणि आपला भारतीय जनता पक्ष महिलांच्या आणि युवतींच्या प्रश्नांसाठी सदैव महिला मोर्चा आणि युवती मोर्चाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल असे उद्गार भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी त्यांच्या भाषणात काढले तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्ष अर्चना अंबुरे यांनीही महिला आणि युवती एकत्र मिळुन महिलांचे तसेच युवतींचे प्रश्म सोडण्यासाठी आम्ही मिळुन काम करु आणि वेगवेगळे कार्यक्रमही उस्मानाबादमध्ये राबवण्या बाबत आम्ही कटीबद्ध आहोत असा विश्वास त्यांनी बोलुन दाखवला तसेच युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनीही त्यांच्या भाषणात फक्त कागदोपत्री सहभाग म्हणून नको तर कामाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे अस्तित्व दाखवावे कारण निम्मे मतदान महिला वर्गाचे  आहे. आणि बंधूच्या भावनेने महिला व युवतींच्या पाठीशी खंबीरपणे आमची सर्व टीम उभी राहील असे मत त्यांच्या भाषणत व्यक्त केले.  युवती मोर्चा पुजा राठोड यांनी येणाऱ्या काळात युवतींचे संघटन खुप मोठ्या प्रमाणात करणार असल्याची ग्वाही दिली. युवती मोर्चा मराठवाडा सहसंयोजिका पुजा देडे यांनीही भारतीय जनता पक्ष हा सर्वांना सोबत घेवुन चालणारा पक्ष आहे आणि पुढील काळात युवती मेळाव्याचे नियोजन करण्यासंदर्भात विचार व्यक्त केला आणि प्रत्येक पदाधिकारी आमच्या सोबत आहे म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. सर्व मुख्य पदाधिकाऱ्यांनी महिला व युवतीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन ,पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top