लोहारा नगराध्यक्षपदासठी दि.8 फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या सौ.वैशाली अभिमान खराडे यांनी व कांग्रेस चे प्रशांत काळे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. तर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची शेवटच्या दिवशी दि.11फेब्रुवारी रोजी कांग्रेस चे प्रशांत काळे यांनी नामनिर्देशनपत्र माघार घेतल्याने शिवसेनेच्या सौ.वैशाली अभिमान खराडे यांची नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दि.14 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे, केवळ औपचारिकता बाकी आहे. शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लोहारा नगरपंचायतीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. लोहारा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड, आ.ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेसची आघाडी करुन निवडणूक लढवुन प्रचार यंत्रणा प्रभावी पणे राबवुन 17 जागेपैकी शिवसेना 9 राष्ट्रवादीला 2 असे शिवसेना, राष्ट्रवादी युतीला 11 जागेवर विजय मिळवुन शिवसेना-राष्ट्रवादी युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. कांग्रेस पक्षाच्या केवळ 4 जागा विजयी झाल्या तर दोन अपक्ष निवडुन आले. अखेर लोहारा नगरपंचायतीवर माजी खा. प्रा. रविंद्र गायकवाड व आ.ज्ञानराज चौगुले यांचे वर्चस्व सिद्ध झाले. नगराध्यक्ष पदाची बिनविरोध निवड होणार असल्याने शहरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.