उमरगा /प्रतिनिधी

 तालुक्यातील जकेकूर येथील  टपाल कार्यालयात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने लातूर मुख्यालयातून चौकशीसाठी कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे.

“इंडिया पोस्ट” या भारतीय डाक विभागाच्या अधिकृत फेसबुक पेजतर्फे डाक विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार जकेकूर येथील टपाल कार्यालयात प्राथमिक स्वरूपात झालेल्या चौकशीमध्ये ४ लाखांपेक्षा अधिक अपहार झाल्याचे सांगितले असून याप्रकरणी संबंधित पोस्टमास्तर डी. आर. कोळी यांना ३ फेब्रुवारी रोजी निलंबित करण्यात आले असल्याचेही स्पष्ठ करण्यात आले आहे. दरम्यान, अपहाराची व्याप्ती मोठी

असल्याने आता लातूर येथील मुख्यालयातून चौकशीसाठी कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे.  संपूर्ण चौकशीसाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागेल असे डाक निरीक्षक सचिन स्वामी यांच्याकडून सांगितले जात आहे.

मोठ्या विश्वासाने जकेकुर पोस्ट ऑफिस मध्ये माझ्या मार्फत ग्रामस्थांचे रु १,०६,९२,९००/- (एक कोटी सहा लाख ब्यांन्नव हजार नऊशे रुपये) सण २०१७ भरणा झालाय तरी विनंती आहे की संबंधित खातेधारकाना व्याजासह रक्कम देण्यात यावी. ग्रामस्थांचा आता पोस्टावरून विश्वास उडाला आहे,ग्रामस्थ मला पैशाबाबत वारंवार विचारणा करीत आहेत”---- निलावती सहदेव बिराजदार,जकेकुर पोस्टल एजंट

 


 


 
Top