तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर बसस्थानक गेली अनेक  वर्षापासुन प्रवाशी  भाविकांनी गजबजुन जात होते माञ कोरोना आरंभ होताच  गेल्या तीन महिन्यांपासून तुळजापूर   बसस्थानकात शुकशुकाट दिसत होता . मात्र आता तुळजापूर  बससेवा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. जानेवारी महिन्यात  एसटीच्या १६७८ फेऱ्या  व फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत ६१३ पूर्ण झाल्या आहेत. संपानंतर  जानेवारी ते आजपर्यत  अडीच लाख किलोमीटर  एसटी धावली.सध्या  तुळजापूर डेपोचे उत्पन्न हळु हळु वाढुन पन्नास टक्यावर आले आहे.

तुळजापूर आगाराचे संपापुर्वी उत्पन्न १० ते १२ लाख होते ते आता साडेचार लाखावर आले आहे. सध्या दोन कामगारांनपैकी ४३ चालक,  ३९ वाहक कामावर आले असुन ३२ कर्मचारी निलंबीत झाले आहेत. सध्या ८५ पैकी 32बसेस रस्त्यावर धावत असुन दररोज बसेस धावण्याची संख्या वाढत  असल्याने तुलजापूर बसस्थानक पुन्हा गजबलेले दिसून येत आहे. 

नोव्हेंबर 2021 मध्ये ७५ डिसेंबर ५११ जानेवारी २०२२१६७८ व फेब्रुवारी मध्ये आज पर्यत ६१३ फे-या बसेस च्या झाल्या आहेत.सर्वसामान्यांची लालपरी धावू लागल्याने तब्बल तीन महिन्यानंतर बसस्थानक पुन्हा एकदा गजबजले आहे तुळजापूर हुन लातुर उस्मानाबाद . सोलापूर , पंढरपूर , अक्कलकोट , पुणे ,  विविध मार्गावर एसटी बस सुरू झाल्या आहेत . बसला आता प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे . बसस्थानकातून दिवसाकाठी जास्त फेऱ्या होत आहेत . लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याचा विचार सुरू असल्याचे डेपोमँनैजर  राजकुमार दिवटे  यांनी सांगितले . 


 
Top