परंडा/ प्रतिनिधी : - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांना स्वाभिमानी महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेजड टीचर्स असोसिएशनच्या वतीने निस्वार्थपणे करत असलेल्या शैक्षणिक सामाजिक कार्याबद्दल सुशीलादेवी महाविद्यालय लातूर येथे आयोजित केलेल्या  संघटनेच्या विभागीय चिंतन बैठकीमध्ये संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ शंकर अंभोरे ,सचिव प्रा विलास पांडे ,विभागीय अध्यक्ष प्रा डॉ शेखर घुंगरवार, विभागीय सचिव प्रा डॉ यु टी गायकवाड व सुशिलादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मुंडे व इतर मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये स्वाभिमानी मुप्टा सन्मान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.   

सन्मानपत्र आणि ट्रॉफी या पुरस्काराचे स्वरूप होते. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल शिक्षण महर्षी गुरुवर्य  रा .गे. शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांनी महाविद्यालयांमध्ये पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख ,गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ अक्षय घुमरे, प्रा जगन्नाथ माळी, जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या च्या प्राध्यापिका डॉ वैशाली थोरात  सत्कार समारंभ  प्रसंगी उपस्थित होत्या. डॉ शहाजी चंदनशिवे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे सचिव सुनील चंदनशिवे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद उपकेंद्राचे माजी संचालक प्राचार्य डॉ अशोक मोहेकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर ,अध्यक्ष सुनील शिंदे, महाविद्यालयाच्या आयक्यूएसीचे चेअरमन डॉ महेशकुमार माने ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तानाजी शिंदे ,माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर,  आमदार सुजितसिंह ठाकूर मा.आ.ज्ञानेश्वरपाटील, मा.नगराध्यक्ष जाकीर सौदागर , माजी शिक्षणाधिकारी शिवाजी चंदनशिवे, दत्तात्रेय चंदनशिवे यांच्यासह त्यांच्या महाविद्यालयातील सहकारी व राजकीय मित्र परिवारांनी कौतुक करून अभिनंदन केले.


 
Top