परंडा /प्रतिनिधी :- 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील इयत्ता अकरावी विज्ञान मध्ये शिकत असलेला आदित्य अनिल जानराव या विद्यार्थ्यांची निती आयोगाने निवड केलेल्या आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याची निवड झालेली आहे.नीती आयोगाने निश्चित केलेल्या एकोणपन्नास निर्देशक यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून काही विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.

या अनुषंगाने सामाजिक न्याय व सबलीकरण विभाग भारत सरकार यांच्याकडून ठराविक क्षेत्रातील माध्यमिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण योजना श्रेष्ठा राबविण्यात येत आहे .सदर योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हा मधून इयत्ता अकरावी मधील अकरा विद्यार्थी मंजूर करण्यात आले आहेत.शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी सदर योजनेकरिता अकरावी मधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड करण्याकरिता 18 जानेवारी रोजी लेखी परीक्षा आयोजित करुन गुणवत्ता यादी सादर  केल्यानुसार आदित्य अनिल जानराव विद्यार्थ्याचे निती आयोगाच्या आकर्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत निवासी शिक्षण योजना  श्रेष्ठा या योजनेअंतर्गत निवड करण्यात आली आहे .केंद्रशासनाच्या निती आयोगामार्फत आकर्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित निवासी शाळेमध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत वेळोवेळी शासनामार्फत निर्गमित होणाऱ्या अटी व शर्ती संस्थेवर विद्यार्थ्यावर बंधनकारक असतील असे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी निवड पत्रामध्ये नमूद केले आहे.गुणवत्ता यादीमध्ये आदित्य अनिल जानराव हा उस्मानाबाद जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.त्याचा प्रवेश अहमदनगर जिल्ह्यामधील आत्मा मालिक ज्ञानपीठ विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चैतन्य पुरी कोकमठाण तालुका कोपरगाव या ठिकाणी झाला आहे.महाविद्यालयातील सहाय्यक ग्रंथपाल अनिल जानराव यांचा तो मुलगा असून त्याच्या या निवडीमुळे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर ,अध्यक्ष सुनील शिंदे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे, महाविद्यालयाचे स्टॉप सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे यांच्यासह , प्राध्यापक, शिक्षकांनी व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आदित्य अनिल जानराव यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


 
Top