उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वाकवड, ता. भूम येथील सात जणांनी एकाचा खून केला होता. या खून प्रकरणातील सातही जणांना भूम येथील सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

या खटल्याची माहिती अशी की, भूम तालुक्यातील वाकवड येथील सचिन येळे, तुकाराम विक्रम येळे, राजेंद्र येळे,  हनुमंत महादेव येळे, महादेव लिंबा येळे, विक्रम नामदेव येळे, अंकुश सोमनाथ येळे या सात जणांनी गावातील एकाचा खून केला होता. या सात आरोपींच्या विरोधात भूम पोलीस ठाणे येथे खूनासहीत खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा  नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एम.बी. सुर्यवंशी यांनी करुन भूम येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावनी अतिरीक्त सत्र न्यायाधीश क्र.1 वडणे यांच्या न्यायालयात होवून मंगळवारी दि. 8 फेब्रुवारी रोजी अंतीम निकाल जाहीर झाला. यात सातहीआरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून आजन्म कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्या सर्व शिक्षा समवर्तीपणे भोगायच्या आहेत.

खून- भा.दं.सं. कलम- 302 मध्ये आजन्म कारावासासह प्रत्येकी 2 हजार रुपये दंडाची शिक्षा, खूनाचा प्रयत्न- भा.दं.सं. कलम- 307 मध्ये आजन्म कारावासासह प्रत्येकी 1 हजार रुपये दंडाची शिक्षा, मारहानीत गंभीर दुखापत करणे- भा.दं.सं. कलम- 324 मध्ये 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, मारहानीत साधी दुखापत करणे- भा.दं.सं. कलम- 323 मध्ये 1 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, ठार मारण्याची धमकी देणे- भा.दं.सं. कलम- 506 मध्ये 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, अवैध जमाव प्रकरणी- भा.दं.सं. कलम- 143 मध्ये 6 महिने सश्रम कारावास, भा.दं.सं. कलम- 147 मध्ये 2 वर्षे सश्रम कारावास, भा.दं.सं. कलम- 148 मध्ये 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.


 
Top