उमरगा / प्रतिनिधी  

  जिल्हा परिषदेच्या वतीने बाल विवाह मुक्त गाव, व्यसन मुक्त गाव सेंद्रिय शेतीतून तयार झालेल्या सकस आहार युक्त गाव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यात प्रत्येक गावातील महिलांनी सहभाग घेऊन आपले आदर्श कुटुंब तयार करावे. माता रमाईच्या त्यागामुळे अनेकांचें संसार फुलले आहेत. आपला संसार सुखाचा करन्यासाठी  व्यसनाचीं आवदसा घरात शिरकावं करणार नाही यांची काळजी घेऊन प्रत्येक माय माऊलींनी घ्यावी व्यसना मुळे आपला समाज रसातळाला चालला आहे सामाजिक परिकर्तन करण्यासाठी महिलांनी कंबर कसून समाज कार्यात हिरहिरीने सहभागी व्हावे  असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या आध्यक्षा प्रा. अस्मिता कांबळे यांनी केले.

तालुक्यातील कुन्हाळी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्याग मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकंर यांचा जन्मोत्सव गुरुवारी दि 24 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या आध्यक्ष स्थानी मीनाताई सूर्यवंशी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मी रमाई बोलतेय या एक पात्री प्रयोगाच्या सादर कर्त्या वैभवी घारगावकर, भारतीय बौद्ध महा सभेच्या केंद्रीय शिक्षिका शारदाताई गजभिये,सरपंच बबिता वडदरे, उपसरपंच प्रज्ञा झाकडे, आश्विनीताई कांबळे, त्रिवेणी गायकवाड, राजश्री भालेराव, चंचलाताई कांबळे, प्रियंकां डोईबळे, धनाजी गोरे, सविता सगर, आशिष कांबळे, मंगलबाई गायकवाड, आदीची उपस्थिती होती.

या प्रसंगी समाजातील सामाजिक कामात आघाडीवर असलेल्या महिलां बचतं गटाच्या कार्यकर्त्यां, शिक्षिका, आदींचा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शारदाताई गजभिये यांनी आपल्या पाल्यावर योग्य संस्कार करण्याची शिकवण दिली रमाई, बाबासाहेब, शिवाजी, जिजाऊ, सावित्रीबाई, महात्मा फुले यांच्या विचाराचे अनुसरण करण्याची शिकवण दिली. या वेळी 

वैभवी घारगावकर यांनी मी रमाई बोलतेय हा एक पात्री प्रयोग सादर करून अनेकांना रडविले डॉ बाबासाहेब आंबेडकर विदेशात शिकायला असताना त्याची दगावलेली मुले हा प्रसंग सांगताना अनेकांना आश्रू आणावर झाले होते.

कार्यक्रमांस परिसरातील महिला पुरुष यांची मोठी संख्या होती.या वेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष प्रा किरण सगर, प्रा संजय कांबळे, प्रा परमेश्वर कांबळे,राहुल कांबळे, भीमराव बनसोडे, राजू सूर्यवंशी, संतोष जाधव, मिलिंद डोईबळे, संजय झाकडे, नितीन ढोणे, बालाजी गायकवाड, तानाजी कांबळे, वैशाली ढेरे, आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती ढोणे यांनी केले प्रास्ताविक सतीश ढोणे यांनी केले आभार संतोष सुरवसे यांनी मानले.समता सैनिक दलाच्या जवाणांनी कार्यक्रम शांततेत होण्यासाठी सहकार्य केले.


 
Top