मुरूम/ प्रतिनिधी  : 

 उमरगा तालुक्यातील कंटेकुर ते मुरूम हा शेतरस्ता मातोश्री पाणंद शेतरस्ता २ किलोमीटर लोकवर्गणीतून कामाची सुरुवात करण्यात आली. कंटेकुर व मुरूम येथील सदन शेतकरी मिळून लोकवर्गणी जमा करून मातोश्री पाणंद शेतरस्ता कामास प्रारंभ शुक्रवारी (ता. २५) रोजी करण्यात आला. या रस्ता कामाचा शुभारंभ  उपविभागीय अधिकारी गणेश पवार, उमरगा नायब तहसीलदार शिवाजी कदम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

 यावेळी मुरूमचे मंडळ अधिकारी तुकाराम आमले, तलाठी सुरेश खरात याची उपस्थिती होती. मुरूम येथील शेतकऱ्यांना त्यांच्या पेरणीपासून ते ऱ्हास होईपर्यत त्रास होत होता. या सर्व अडचणी लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन बैठक घेतली. या बैठकीत सर्व शेतकऱ्यांनी एकरी २ हजार रुपयाप्रमाणे लोकवर्गणी जमा करून कंटेकूर ते मुरूम हा २ किलोमीटर शेतरस्त्याच्या माती काम करण्यास सुरुवात केली आहे. माधवराव शिवलिंगप्पा पाटील व मल्लिनाथ गुंडगुळे यांच्या प्रयत्नाने लोकवर्गणी करून माती कामाची सुरुवात झाली. या भागातील शेतकरी दत्तात्र्य चटगे, विठ्ठल चटगे, गोपाळ शिंदे, जितेंद्र धुम्मा, व्यकंट माने, मोहन कदम, नागेश चटगे आदी शेतकरी उपस्थित होते. 

 

 
Top