वाशी/ प्रतिनिधी-

तालुक्यातील पारगाव पासून जवळच मांजरा नदी जवळ भूम हुन बीड कडे जाणारा पिकअप व जालना येथून पारगाव कडे येणारी मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकल वरील एकाच जागीच मृत्यु झाला असून एकजण गंभीर जखमी झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भूम तालुक्यातील आष्टा येथून द्राक्षे घेऊन अमरावती कडे जाणारा पिकअप mh 16,cc 8114 जात असताना पारगाव पासून जवळच मांजरा नदीच्या पुलावर आला असता जालना जिल्ह्यातून पारगाव तालुका वाशी येथे आपल्या पाहुण्यांना  मोटर सायकल mh21,bj1263 हुन भेटण्यासाठी येणारे यांची जोराची धडक झाली यामध्ये मोटारसायकल वरील अर्जुन नाना धुमाळ वय 60 राहणार ढाकलगाव ता.अंबड जि.जालना  हे अपघात घडताच जागीच ठार झाले.त्यांच्या सोबत असणारी त्यांची पत्नी शोभा अर्जुन धुमाळ यांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात घडताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पिकप चा चालक सागर अर्जुन चव्हाण वय 24 रा वांगी ता भूम व पिकप मधील स्वप्निल किसन गटकळ राहणार आष्टा तालुका भूम या दोघांनाही वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत वाशी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.


 
Top