उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवार दि. 20 फेबुृवारी रोजी मतदान. 98 .76 झाले आहे. विशेष म्हणजे चुरशीच्या झालेल्या या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ह्दयविकाराच्या झटका आलेल्या मतदारास अतिदक्षता विभागातून रूग्णवाहिकेतून कळंब मधील मतदान केंद्रावर आणून मतदान करून घेण्यात आले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीविरूध्द भाजप यांच्या 10 संचालकांच्या पदासाठी िनवडणुक होत आहे. यापुर्वी महाविकास आघाडीच्या 5 जागा बिनविरोध आल्या आहेत. 

 उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ संचालक मंडळासाठी पंचवार्षीक निवडणुक जाहीर झाली होती. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर हे मतदान सुरु आहे. जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. संचालक मंडळाच्या एकूण 15 जागांपैकी 5 जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. आता 10 जागेसाठी उमेदवारांचं भवितव्य सोमवारी ठरणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार ओमराजे  िंनंबाळकर  , आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्यासह भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील   यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सोमवारी मतमोजणी

उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या 10 संचालक पदाच्या जागेसाठी 22 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी व विरोधी गटातील भाजपच्या उमेदवारांसह 2 अपक्षांचा समावेश आहे.   दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 पासून मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले होते. मतदानाचीवेळ संपायच्यापुर्वीच जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर एकुण 98.76 टक्के मतदान झाले  असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दिली.


अतिदक्षता विभागातून थेट मतदानाला

ह्दयविकाराच्या झटका आलेल्या मतदारास अतिदक्षता विभागातून रूग्णवाहिकेतून कळंब मधील मतदान केंद्रावर आणून मतदान करून घेण्यात आले आहे. या संदर्भात निवडणुक िनर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच हे मतदान करून घेतल्याचे सांगण्यात आले. मतदाराला ह्दयविकाराच त्रास होत असल्यामुळे रूग्णवाहिकेतच मतपत्रिका आणून मतदान घेण्यात आले. यावेळी निवडणुक विभागातील अधिकारी-कर्मचारी समोर उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकीत एका मताला किती महत्व िदले गेले हे यावरून दिसून येते. या घटनेचे उस्मानाबाद सर्वत्र एकच चर्चा होत आहे. 


 
Top