उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शिवजन्मोत्सव सोहळा 2022 आयोजीत गुणगौरव सोहळा मौजे आळणी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात आळणी गावातील नवोदय, स्कॉलरशिप, अभियांत्रिकी व वैद्यकीय कॉलेजला प्रवेश मिळालेल्या गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालका समवेत ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.* 

 आळणी गावातील सैन्यदलात देशसेवा करुन सेवानिवृत्त सैनिकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला हेच या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. कोरोना कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देत दोन विशेष सत्कार ही करण्यात आले. या वेळी शिवव्याख्याते ॲड.जयप्रकाश साळूंके यांचे शिवरायांवर सुंदर असे प्रेरणादायी व्याख्यान झाले. 

 कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आळणी गावचे सरपंच प्रमोद (काका) वीर, तर प्रमुख पाहुणे उपसरपंच कृष्णा गाडे, जीवनराव गोरे माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र मडके सर व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बशीर तांबोळी सर होते. ्रास्ताविक सद् -भावना ग्रुपचे सदस्य श्री. महेश वीर यांनी तर आभार सद् भावना ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. शिवदास चौगुले यांनी मानले. सुत्रसंचलन श्री दादासाहेब गायकवाड यांनी केले.  सामजिक, शैक्षणिक कार्यात व आळणी गावचा विकास कार्यात अग्रेसर सद्भावना ग्रुपच्या या अशा वारंवार घेतलेल्या उपक्रमामुळे निश्चित गावाचा विकास होण्यास हातभार लागणार आहे. सद्भावना ग्रुपने समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण करण्याचा वसा घेतला आहे.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी सद्‌भावना सेवाभावी संस्था व समस्त ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. 

 
Top