वाशी/ प्रतिनिधी-

वाशीच्या नगराध्यक्ष पदावर  भाजपाच्या विजयाबाई गायकवाड ह्या आज (१४ फेब्रुवारी ) रोजी विराजमान झाल्या. वाशीचे उपनगराध्य म्हणून भाजपा पॅनल प्रमुख सुरेश कवडे यांनी सत्तेची सुत्र हाती घेतली. आज येथील नगर पंचायत कार्यालयात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आलेली होती. या सभेत या निवडी करण्यात आल्या.

  नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी वाशी नगरपंचायत मध्ये पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळंब यांनी बैठक बोलावली होती पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सर्वप्रथम नगराध्यक्षपदाची निवड निवडणूक घेण्यात आली नगराध्यक्षपदासाठी विजयाबाई गायकवाड व शिवहार  स्वामी यांचे अर्ज होते हात उंच करून मतदान घेण्यात आले यावेळी विजयाबाई गायकवाड  यांना 10 मते तर शिवहार  स्वामी यांना सात मते मिळाली. उपनगराध्यक्ष पदासाठी श्री सुरेश कवडे व श्री नागनाथ नाईकवाडी यांचे अर्ज होते. उपनगराध्यक्ष निवडीमध्ये ही हात उंचावून मतदान घेण्यात आले यावेळी श्री सुरेश कवडे यांना दहा तर श्री नागनाथ नाईकवाडी  यांना सात मते मिळाली. वाशीच्या मतदान वाशी नगराध्यक्ष निवडीनतंर नुतन नगराध्यक्षा विजयाबाई गायकवाड उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांचा उपविभागीय अधिकारी कळंब तथा पिठासन अधिकारी अहिल्या गाठाळ, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गिरिष पंडीत यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

    या पदाची आज (१४ फेब्रुवारी) रोजी या पदाच्या निवडणुकीची औपचारिकता पार पडली.  निवड झाल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर तसेच वाशी येथील शिवाजी चौकामध्ये फटाके वाजवून जल्लोष साजरा केला पेनल प्रमुख श्री सुरेश कवडे यांनी शिवाजी चौक या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.नगराध्यक्ष निवडीसाठीच्या विशेष सभेच्या पिठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळंब अहिल्या गाठाळ यांना  नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गिरिष पंडित यांनी त्यांना सहकार्य केले.


 
Top