उमरगा / प्रतिनिधी- 

जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते विजय काका जाधव व प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे, डॉ. लक्ष्मण सातपुते, डॉ,प्रेमनाथ चव्हाण, डॉ, संदीप बनसोडे ,माजी सैनिक बालाजी मद्रे, डॉ. सागर पतंगे, जिजाऊ ब्रिगेडच्या मंजुषा ताई चव्हाण ,सौ पल्लवी माडजे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाले

राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई व महाराष्ट्र राज्य शासन यांनी केलेल्या आव्हानाला  प्रतिसाद देत वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन कडून संपूर्ण महाराष्ट्रभर शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे .त्याचाच एक भाग म्हणून उमरग्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 25 रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला .वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष मराठा प्रवीण आणि कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी, राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमरग्यात महेश फंड मनोज मोरे, कार्तिक जगताप ,निलेश कदम, ज्ञानेश्वर जाधव, किशोर माडजे, नितीन भांगे, बालाजी बिराजदार, लखन मिरकले ,अंकुश जाधव व राजे ग्रुप समुद्राळचे सदस्य यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. 

 
Top