तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील  भवानी रोड  खडकाळ गल्लीतील अतिक्रमणे नगरपरिषद ने पोलिस बंदोबस्तात  सुमारे २०० ते २५० अतिक्रमणे हटवले आहे. यातील भवानी रोड व खडकाळ गल्लीतील श्रीतुळजाभवानी मंदीर ते शुक्रवार पेठ पाण्याची टाकी या भाविकांची  सर्वाधिक वर्दळीचा रस्त्यावर असणारे अतिक्रमणे ही हटविण्यात आले. 

  तिर्थक्षेञ तुळजापूर येथील नगरपरिषदवर प्रशासक आल्यापासुन अतिक्रमणे हटाव मोहीम वेगवेगळ्या भागात जोरात  सातत्याने  सुरु असुन सोमवारी प्रथमच जुना तुळजापूर म्हणून प्रसिध्द असलेला खडकाळ गल्लीतील  श्रीतुळजाभवानी मंदीर ते शुक्रवार पेठ या  रस्त्यावर वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले.या भागातील रस्तांनी आज ख-या अर्थाने  कितेक वर्षांनी मोकळा श्वास घेतला.

  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने तुळजापूर नगरपरिषदचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी कार्यालयीन अधीक्षक अधीक्षक वैभव पाठक, स्वछता विभाग प्रमुख दत्ता सांळुके, कर निरक्षक रणजित कांबळे, अभियंता प्रकाश चव्हाण, नगरअभियंता अविनाश काटकर, गुणवंत कदम, विश्वास मोटे, राजाभाऊ सातपुते  यासह  नगरपरिषद कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्या मदतीनs या रस्त्यावर फुटपाथ वर उभारलेले अतिक्रमणे हटविण्यात आले. 

 
Top