तेर/  प्रतिनिधी 

तेर ता. उस्मानाबाद येथील  कालेश्वर  मंदिरात दि. २३ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत  कालेश्वर  मंदिरात श्री. संत गोरोबा काका व शिव  मंदिर ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व पसायदान भावकथा निरुपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह कालावधीत  दररोज दुपारी व संध्याकाळी महाप्रसादाच्या वाटपासह  विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .

त्याचबरोबर ह.भ.प. दिपक महाराज खरात यांच्या मधूर वाणीतून सप्ताहातील सात दिवस संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान निरुपणासह राज्यभरातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तनसेवा संपन्न होणार आहे .यामध्ये  ह.भ.प. अप्पा महाराज जावळे , ह.भ.प. लक्ष्मण महाराज बोरगडीकर , ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज आंबीरकर ,  ह.भ.प. अमोल महाराज बोधले , ह.भ.प. कान्होबा महाराज देहूकर ,  ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कुंभार ,  ह.भ.प. प्रेमानंद महाराज अंबेकर शास्त्री आदी कीर्तनकाराची कीर्तनसेवा संपन्न होणार आहे तर बुधवार दिनांक २ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांची काल्याचे कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे .तरी भाविक भक्तांसह नागरिकांनी या सप्ताह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन भगवान कालेश्वर व श्री. संत गोरोबा काका मंदिराचे प्रशासकीय अधिकारी पी. बी. भोसले , व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी केले आहे.

 
Top