उमरगा/ प्रतिनिधी- 

 येथील प्रा रेखा  जाधवर- नागरगोजे या नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट व जीआरएफ परीक्षेत पात्र झाल्या आहेत. यामुळे त्यांना सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे येथे करत असलेल्या पीएचडी साठी प्रतिमाहिना ३५००० रुपये फेलोशिप मिळणार आहे.

 नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट व जीआरएफ परीक्षा डिसेंम्बर २०२० व जून २०२१ परीक्षेचा  निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला आहे.  महाविद्यालयातील असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी ही परीक्षा महत्त्वाची असते. युजीसी नेट २०२१ या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे १२ लाखाहून अधिक विद्यार्थी सामोरे गेले होते.देशभरातील २३९ शहरातून ८३७ परीक्षा केंद्रावर ८१ विषयासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.

 शिक्षणशास्त्र या विषयासाठी  सुमारे ७०५४४ विध्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यापैकी  ४०४८५ विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या मध्ये नेट साठी ३६८६ उमेदवार पात्र ठरले तर ५०३ उमेदवार जीआरएफ साठी पात्र ठरले आहेत.पात्र उमेदवारांना युजीसी मार्फत प्रतिमाहिना ३५००० रुपये  फेलोशिप मिळते.

प्रा रेखा गुणवंत जाधवर या सध्या प्रतिभा कॉलेज ऑफ एज्युकेशन चिंचवड पुणे येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत.सावित्रीबाई फुले विध्यापिठ पुणे येथे त्या पीएचडी करत आहेत.यापूर्वी त्या सेट व नेट पात्र झाल्या आहेत. नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट व जीआरएफ परीक्षेत त्या पात्र झाल्या मुळे त्यांना युजीसी कडून प्रतिमाहिना ३५००० रुपये फेलोशिप मिळणार आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


 
Top