उस्मानाबाद / प्रतिनिधी-
मौजे कोंडजिगड तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथील सर्व जमीन धारक शेतकरी आपल्या प्रशासनाला पत्र देऊन दि. 23 फेबुृवारी 2022 पासून साखळी उपोषण सुरू आहे. परंतू  कारखान्याचे कार्यकारी संचालक व कंपनीचे जनरल मॅनेजर व चेअरमन यांनी  शेतकऱ्यांची कसल्याही प्रकारची दाद घेतली नाही व आपल्या प्रशासनाकडून आम्हा शेतकऱ्यांना पोलीस प्रोटेक्शन किंवा आरोग्य सेवा दिली नसल्यामुळे आमच्याकडे काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात न्याय देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
 सर्व शेतकऱ्यांना कारखान्याचे  चेअरमन यांनी आम्हाला खोटे आश्वासन देऊन आमच्या जमिनी अतिशय अल्प दरामध्ये म्हणजे विक्री 15000 हजार इतका मोबदला देऊन तुमचा एक मुलगा कायमस्वरूपी नोकरीवर घेऊ असे खोटे आश्वासन देऊन आमच्या जमिनी हडपल्या आमच्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्याकडे हाताला काम पण नाही त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी हतबल झाले असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला. निवेदनावर   वजीर शेख तालुका कार्याध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना उमरगा,  दयानंद जगन्‍नाथ माडजे,  संभाजी महादेव नेलवाडे,  खंडू नागनाथ सूर्यवंशी,  गोविंद भाऊराव बिराजदार,   संदिपान शामराव काटकर, चोखोबा सोपान, लक्ष्मण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top