उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

बारावी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्तीस वैद्यकीय उपकरण विक्रीच्या परवाना व्यवसायाला अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्यावतीने विरोध केला आहे. उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना 25 फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले आहे.

 जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सांगण्यात आले आहे की,फार्मसिस्ट उमेदवारांची संख्या भरमसाठ असताना नोकरी आणि व्यवसाय मात्र अत्यल्प स्वरूपात उपलब्ध आहेत. रक्त, उत्पादने,स्टेट या सारख्या अत्याधुनिक वस्तूंच्या विक्रीशी संबंध नसलेल्या व्यक्तींना परवाना देऊन सरकार जनतेच्या जीवाशी खेळत आहे,असे असोसिएशनच्यावतीने निवेदनात नमूद केलेले आहे. भारत सरकारने औषधी परवाना देखील फक्त फार्मसिस्ट यांनाच जारी करावा आणि फार्मसिस्ट व्यतिरिक्त कोणालाही परवाना देऊ नये अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आलेली आहे. 

या निवेदनावरती अखिल भारतीय फार्मसिस्ट असोसिएशनचे मराठवाडा कार्यकारणी सदस्य नितीन सातपुते यांच्यासह औषधी विक्रेते विजय कुमार घोडके,राजगुरू अभिमन्यू, ज्योती नितळीकर,प्रदीप साळुंखे,गोविंद कोळी,पृथ्वीराज चव्हाण,नवगिरे,लोंढे,इंगळे,पोतदार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top