उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पतसंस्था ते उस्मानाबाद जनता बँकेचे अध्यक्ष, असा बँकिंग क्षेत्रातला वसंतराव नागदे यांचा प्रवास थक्क करणारा अाहे, असे गाैरवाेद्गार उद्याेजिका सुलभा पाटील यांनी काढले. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे आणि उपाध्यक्ष वैजिनाथ शिंदे यांचा सोमवारी (दि.२१) परिमल मंगल कार्यालयात नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी सुलभा पाटील बाेलत होत्या.

कार्यक्रमासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाश बोधले महाराज, सत्कार समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुलभा पाटील म्हणाल्या, वसंतराव नागदे बँकींग क्षेत्रातील दिग्गज आहेत. कर्ज देताना मुल्यांशी तडजोड केली नाही. कर्ज वाटप करताना गोरगरीबांच्या आर्थिक उन्नतीकडे लक्ष दिले. त्यांनी अनेक तरूणांना त्यांच्या पायावर उभे करण्यास मदत केली. आता मात्र श्री. नागदे यांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकेत एक विशेष आर्थिक मदतीसाठी महिला शाखा स्थापन करावी, अशी अपेक्षा त्यांनी केली.

दरम्यान,याच कार्यक्रमात सत्कार समितीच्या वतीने वसंतराव नागदे व वैजिनाथ शिंदे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन डॉ. रमेश दापके यांनी केले.प्रास्ताविक धनंजय शिंगाडे यांनी केले. कार्याचा गौरव भाऊसाहेब उंबरे यांनी केला. आभार संपत डोके यांनी मानले.यावेळी मधुकर तावडे, महाराष्ट्र बार कौन्सिलचे अ‍ॅड.रामभाऊ गरड, राजाभाऊ बागल, राजर्षी शाहू शिक्षण मंडळाचे सचिव धनंजय पाटील, प्रमोद साळुंके,ज्येष्ठ पत्रकार संतोष हंबीरे, नानासाहेब निंबाळकर,भारत इंगळे,प्राचार्य जयसिंगराव देशमुख,डॉ.रमेश दापके,चंद्रकांत फुलसे, तुषार निंबाळकर, संपतराव डोके, डी. एन. कोळी, सुनिल शिंदे व इतर उपस्थित होते.

 
Top