तुळजापूर / प्रतिनिधी -

तालुक्यातील किलज येथील भरचौकात असणारे तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी गुरुवार दि.३रोजी पहाटे दीड वाजण्याचा सुमारास फोडुन २६२५०रुपयाचा मुद्देमाल चोरल्याची घटना घडली आहे. 

 किलजमधील भर चौकातील २ किराणा दुकाने तर एक हॉटेल वर चोरट्यानी दि.३ फ्रेब्रुवारी रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास  चौकातील राजेंद्र मर्डे यांच्या किराणा दुकानातील रोख रक्कम १२ हजार आणि प्रसाद मोजगे यांच्या दुकानात किराणा साहित्य तेलबॉक्स (रु.२४००) आणि चहापती (रु ८५०) तसेच रोख रक्कम ८००० तसेच चौकातील दत्ता राजमाने यांच्या हॉटेलमधील साहित्य (रु.१०००) व रोख रक्कम २००० असे एकूण २६ हजार दोनशे पन्नास रुपये लंपास केले आहे.विशेष म्हणजे किलज गावात सीसी कॅमेऱ्याची नजर असून सुद्धा चोरट्यानी हे धाडस केले आहे.ह्या अगोदर ही चोरीच्या घटना घडल्या आहेत.चोरट्यानी चोरी केलेली दृश्य ही कॅमेऱ्यात कैद झाले असुन तीन संशायत मंडळी तोंडाला मफलर बांधून फिरत असल्याचे दिसत  आहेत.चोरट्यानी चोरी करून पैशाचे गल्ले हे गावच्या बाहेर फेकून दिले आहेत.गावात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असताना देखील चोरट्यानी हे धाडस केलंच कस असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होतो आहे.अज्ञात चोरट्यांविरुद्ध  पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
Top