उस्मानाबाद ः तालुक्यातील उपळा (मा) येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे आमदार कैलास घाडगे- पाटील यांनी शिवसेना पक्षामध्ये स्वागत केले.  

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांना प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख तथा राज्याचे राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना संपर्कप्रमुख माजी मंत्री डॉ. प्रा. आ. तानाजीराव सावंत, जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील यांनी सामाजिक व राजकीय कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. नाागरिकांच्या समस्या जाणून घेत, सर्वांना बरोबर घेऊन लोककल्याणाची कामे अधिक सक्षमपणे करावीत व पक्ष अधिक मजबुत करावा, अशी अपेक्षा जिल्हाप्रमुख तथा आ कैलास पाटील यांनी व्यक्त केली. उपळा(मा) ता उस्मानाबाद येथील प्रमोद पडवळ, माजी उपसरपंच प्रवीण पडवळ, शरद पडवळ, रोहन पडवळ, शीकांत जोशी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला. मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार घाडगे- पाटील हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आमदार घाडगे  पाटील यांचे सहकार्य लाभत असल्याने  त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले.
 
Top