उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 आज सोमवार दि.07 फेब्रुवारी 2022 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती,उस्मानाबाद यांचे वतीने जेष्ठ गायिका,गानकोकीळा,पद्मविभूषण, भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांना उस्मानाबादकर वासीयांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष श्री.शशिकांत खुने म्हणाले की,”स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या निधनाने भारत देशाची अपरिमित हानी झालेली आहे.या नारीरत्नाने आपल्या जादुई आवाजाने गेल्या सत्तर वर्षापासून जगातील करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.लता मंगेशकर यांना विसरणे कदापी शक्य नाही.साधे सरळ व्यक्तीमत्व असलेल्या लताबाई मंगेशकर या समाजप्रिय व राष्ट्रभक्त विचारवंत होत्या.भारताने आज एक दुसरा कोहिनूर हिरा गमावला आहे”.यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक जिजाऊ जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष श्री.अमोल शिरसट, शिवराज्याभिषेक सोहळा समिती चे उपाध्यक्ष श्री.धर्मराज सुर्यवंशी, सचिव श्री.दत्तात्रय साळुंके,गुंडोपंत जोशी,जयराज खोचरे,अच्युत थोरात मेजर, सुनिल मिसाळ,अमोल पवार, योगेश आतकरे,सचिन कदम, ओमकार शितोळे,विलास पाटील, अभिजित क्षीरसागर इ.सहकारी उपस्थित होते.


 
Top