उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू प्रायमरी अॅण्ड हायस्कुल ,खाजानगर येथे शिकत असलेले विद्यार्थीनी एकत्रीत येवून  हिजाब बंदीचा निषेध करत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले.

निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक सरकारने ड्रेस कोड कायद्यातंर्गत मुस्लीम मुलींना हिजाब परिधान करून शाळे मध्ये प्रवेश करण्यास मनाई करणे हे भारतीय संविधानातीच्या कलम २५ नुसार मिळालेल्या मुलभूत अधिकाराची पायमल्ली करणारा कायदा आहे.

भारतीय राज्य घटनेनुसार मिळालेल्या मुलभूत अधिकारानुसार धार्मिक मुलभूत गोष्टी हया श्रध्दा व परंपरा जपण्याचा व आचरणात आणण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळेच ईस्लाम धर्मानुसार हिसाब परिधान करणे सुध्दा हे मौलीक अधिकारात येते आणि ते कोणत्याही कायद्यानुसार कोणत्याही राज्याला हिरावून घेता येव शकत नाही. कर्नाटक सरकार व उडपी येथील पी.यु.कॉलेजने विद्यार्थ्यांमध्ये हिजाब वरून विष पेरण्याचे काम केले आहे ते समाजाला व देशाला परवडणारे नाही याची तिव्रता वाढण्या अगोदर महामहीम,राष्ट्रपतींनी कर्नाटक सरकारच्या या निर्णयामध्ये हस्तक्षेप करून येथील पारीत करण्यात आलेला ड्रेस कोड कायदा रद्द करून देण्याची मागणी केली आहे. निवेदनावर विद्यार्थीर्नीच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top