उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण करून घ्यावे या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कर्मचारी दुखवटा आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहेत. परंतू प्रशासन व सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांच्या निषेधार्थांत तुळजापूर आगारातील वाहक हनुमंत चंद्रकांत आकोसकर  (३९ ) यांनी राहत्या घरी विषप्राशन करून शुक्रवार दि. २५ फेब्रुवारीच्या रात्री आत्महत्या केली होती. शनिवार दि. २६ फेब्रुवारी रोजी आकोसकर यांचा मृतदेह मध्यवर्ती बसस्थानक उस्मानाबाद येथे आणल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान विभाग नियंत्रक अमृता ताम्हाणकर यांनी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले आहे. 

 उस्मानाबाद शहरातील गणेश नगर येथील वाहक हनुमंत चंद्रकांत आकोसकर  यांनी आपल्या घराच्या बाजूस व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील मोकळ्या जागेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी राञी ९:३० वाजण्याच्या सुमारास झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तातडीने  घटनास्थळाचा शहर पोलीस यांनी भेट देऊन पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना सदर बातमी समजताच एकच सर्वत्र खळबळ उडाली. २६ फेब्रुवारी रोजी आकोसर यांचा मृतदेह एसटी-कर्मचारी आंदोलन करीत असलेल्या एसटी बसस्थानकावर आण्यात आला. यावेळी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, एसटी विभाग नियत्रंक अमृता ताम्हणकर यांनी कर्मचाऱ्यांना धीर देत टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन केले.  मृत कर्मचारी आकोसकर  यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. 


ठाकरे सरकार असंवेदनशील

एसटी कर्मचारी अकोसकर यांच्या आत्महत्याने अतिशय वेदना झाल्या आहेत.एसटी कर्मचाऱ्यांनो टोकाची भूमिका घेऊन नका, ठाकरे सरकार ने कालच्या मंत्री मंडळाच्या बैठकीतच न्यायालयात कागदपत्र दाखल करण्यासाठी निर्णय घेणे आवश्यक होते. परंतू असे केले नाही. गेल्या अनेक दिवसापासून चालू असलेल्या एसटी कर्मचारी संपाबाबत ठाकरे सरकार असंवेदनशील झाले आहे. अशी टीका करून एसटी अधिकाऱ्यांना अकोसर यांच्या कुटुंबीयाना  तातडीने मदत द्या,अशा सूचना भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या. 


मृत कर्मचाऱ्यांवर कोणती ही कार्रवाई नव्हती

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत २३८ कर्मचारी निलंबीत केले होते. त्यापैकी २० कर्मचाऱ्यावरील निलंबन मागे घेतले. तर १६२ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. सध्या ८०० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे १०० बसेस चालू आहेत. मृत कर्मचारी अकोसकर यांची सेवा पाच वर्ष झाल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यांच्या कुटुंबीयांना तातडीची पाच हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे इतर अनुकंपा तत्वावरील नौकरीचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी शांतता व संयम राखावा, असे आवाहन एसटी विभागनियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी केले आहे. 


 
Top