तुळजापूर / प्रतिनिधी-

श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचा विकास आराखड्यामुळे फक्त  विशीष्ट भागाचाच विकास  होणार  असुन यामुळे शहरवासियात अर्थिक विषमता निर्माण होणार असुन  सर्वांना सोयीचा होईल, असा विकास आराखडा करावा अशी मागणी पुजारी मंडळाने जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष यांना निवेदन देवुन केली आहे.

 निवेदनात म्हटलं आहे की, घाटशिळ वाहन तळ ऐवजी विजय वाचनालय व नगरपरिषद जुनी भाजीमंडई ची जागा ताब्यात घेऊन येथे  दर्शन मंडप इमारत उभी  करावी, श्री तुळजाभवानी मंदीरात प्रवेश व बाहेर पडणे मार्ग बाबतीत व्यापक विचार करुन अनेक मार्ग विकसीत करावेत, विकास कामे करताना पुजारी मंडळास विश्वासात घ्यावे व हे कामे गुणवत्ता पुर्ण भाविक- भक्तांना सोयीचे ठरतील या दृष्टीने करावेत असे निवेदनात म्हटले आहे.   सदरील निवेदनाच्या प्रती मुखमंञी पर्यटन मंञी प्रधान सचिव विधी व न्याय विभाग मंञालय मुंबई संचालक पुरातत्व विभाग पालकमंञी , खासदार, विश्वस्त यांना दिल्या आहेत.


 
Top