उस्मानाबाद   / प्रतिनिधी :-

येथील संकेत फाटक दिग्दर्शित चांदर फिल्म डॉक्युमेंटरीला  लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन प्राप्त झाले.त्याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते संकेत फाटक यांचा सत्कार करण्यात आला.

चांदर या फिल्म डॉक्युमेंटरीला लंडन फिल्म फेस्टीवलमध्ये नामांकन प्राप्त झाले आहे. गुरुवारी (दि.17) उस्मानाबाद येथील श्री टॉकीज येथे या डॉक्युमेंटरीचे प्रक्षेपण व कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. संकेत शिवाजीराव फाटक या तरुणाने केलेल्या पहिल्याच प्रयत्नाला यश आले. त्याबद्दल मित्रपरिवाराकडून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी संकेत फाटक यांचा सत्कार केला. यावेळी संकेत फाटक यांचे वडील शिवाजीराव फाटक, आई शकुंतला फाटक, बंधू स्वप्निल फाटक, प्रतिष्ठित मंडळी मित्रपरिवार यांची उपस्थिती होती.


 
Top