उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील यशवंतराव चव्हाण सभागृह जि.प. येथे प्रति वर्षा प्रमाणे पाचव्या वर्षी हौशी छंदी गायक मेलडी स्टार समुहाचा “साल नया गीत पुराणे..” या जुन्या अवीट गीतांची मैफील संपन्न झाली . प्रथम लता मंगेशकर व बप्पी लहरी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पित करुन श्रद्धाजंली वाहण्यात आली . 

आमदार राणाजगजितसिंह पाटील, पंडीत दिपक लिंगे, जि.प. अध्यक्षा अस्मिता कांबळे, ह.भ.प. लोमटे महाराज जेष्ठ विधिज्ञ पंडीतराव नळेगावकर, राजेंद्र अत्रे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, समुह प्रवर्तक युवराज नळे , शनिवार मंडळाचे अरुण जोशी,सौ.वर्षा नळे, समन्वयक शेषनाथ वाघ, समग्र प्रकाशनचे देविदास पाटील यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले लता मंगेशकर यांच्या गीताने प्रगती शेरखानेने मैफलीची सुरुवात केली त्या नंतर सहभागी कलाकार जेष्ठ विधिज्ञ मा. दिपक पाटील, अक्षय भन्साळी, मल्हारी माने , शेषनाथ वाघ , रविंद्र कुलकर्णी , क्षितीजा निंबाळकर, युवराज नळे , नितीन बनसोडे , शर्वरी डोंगरे,धनंजय कुलकर्णी, श्याम सुंदर भन्साळी ,अर्चना अंबुरे, मुनीर शेख, नितीन भन्साळी, राजश्री निंबाळकर , तौफीक शेख ,अस्मिता कांबळे यांनी गायन केले.हौशी कलाकारांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीत ऐकून संगीत तज्ञ गुरुवर्य दिपक लिंगे सरांनी मनापासून सर्वांचे कौतुक केले. ही मैफील यशस्वी होण्यासाठी राजाभाऊ कारंडे, बाबा गुळीग, गणेश वाघमारे,सुधीर पवार , विक्रांत नळे ,सागर पाटील यांनी परिश्रम घेतले. समुह सदस्य मुकुंद पाटील, अरविंद पाटील,  गायक कुटुंबातील सदस्यांसह  मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. सुत्रसंचालन सोनाली डोंगरे यांनी केले तर आभार तौफीक शेख यांनी मानले. जीवनातील सार असलेली कवाली चढता सुरज धीरे धीरे ढल जायगा मुनीर शेख यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

 
Top