उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी, भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य - एका मताचे सामर्थ्य” ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू कली आहे.या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत 15 मार्च 2022 पर्यंत आहे.या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  SVEEP (Systematic Voters Education and Electoral Participation) मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित करुन निवडणूक आयोग सामान्य लोकांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर करून त्यांच्या सक्रिय सहभागातून लोकशाही बळकट करत आहे. यामध्ये सर्व वयोगटांना सहभागी होता येणार आहे. सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्व विशद करण्याच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्पना आणि मजकूरांचा गौरव करणे, असा या मागील उद्देश आहे.

 राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धत पाच प्रकारच्या स्पर्धा होत आहेत:-  त्यात प्रश्नमंजूषा,  घोषवाक्य, गीत गायन, व्हिडओ मकिंग आणि भिंत्तीचित्र स्पर्धेचा समावेश आहे.20 हजार,  10 हजार आणि 7 हजार 500 रुपये असे अनुक्रमे प्रथम,व्दितीय आणि तृतीय पारितोषिक दिली जाणार आहेत. सहभागी होणाऱ्यापैकी 50 स्पर्धकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे विशेष उल्लेखनीय पुरस्कार  देण्यात येणार आहेत. 

  स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे, नियम आण अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ htps://ccisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी.सर्व प्रवेशका 15 मार्च 2022 पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलांसह voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवण्यात याव्या. 


 
Top