उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 थोर समाजसुधारक संत गाडगेमहाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आज त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, महसूल प्रशासनचे तहसीलदार प्रवीण पांडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, कुलकर्णी, श्रीमती अर्चना मैंदर्गी, अव्वल कारकून नरसिंह ढवळे आदीं प्रमुख उपस्थित होते.


 
Top