उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत उस्मानाबाद संघाने घवघवीत यश संपादन केले. तीन सुवर्णासह, तीन रजत पदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली.

 सांगली येथे महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन आणि सांगली जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी सबज्युनियर राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा २०२१ - २२ आयोजित करण्यात आली हेती. दि. २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा संघाने घवघवीत यश प्राप्त केले.

मुलांच्या एकेरी स्पर्धेत यश हुंडेकरी, मुलींमध्ये प्रियांका हंगरगेकर आणि मुलांच्या दुहेरी स्पर्धेमध्ये कृष्णा थिटे व यश हुंडेकरी यांनी सुवर्णपदक पटकावले. मुलांच्या एकेरी स्पर्धेत कृष्णा थिटे, मिश्र दुहेरी स्पर्धेत प्रियांका हंगरगेकर, यश हुंडेकरी आणि मुलांच्या संघाने (टीम इव्हेंट - कृष्णा थिटे, उन्मेष माळी, यश हुंडेकरी, समर्थ शिंदे, प्रथमेश अमृतराव, श्रेयस गायकवाड, हर्षवर्धन गुळवे) रजतपदकांची कमाई केली.  या संघाला प्रशिक्षक संजय नागरे, हेमंत कांबळे, राहुल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.


 
Top