उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील शिवशंभूपंढरी नगरातील सार्थसत्य येथे मराठी चित्रपट सृष्टीतील , नाट्य चळवळीतील नियामक मंडळाचे सदस्य जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचा अखिल भारतीय कलाक्षेत्रासाठी कार्य करणारे व्यक्तींचा सत्कार जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने सन्मानचिन्ह , शाल देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी संस्कार भारती पदाधिकारी श्यामसुंदर  भन्साळी , अरविंद पाटील, शेषनाथ वाघ,शरद वडगावकर, सुरेश वाघमारे, सत्यहरी वाघ, अनिल ढगे, अनिल मालखरे उपस्थित होते. अभिनेते विजय कदम यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मराठवाडा जशी संताची भुमी तसेच रंगकर्मी या भुमीत आहेत जिल्हा नाट्य परिषदेच्या माध्यमातून विशाल शिंगाडे एकांकिका स्पर्धेचे आयोजन करुन स्थानिक रंगकर्मीनां प्रेरणा मिळून नाटय चळवळ जागृत ठेवण्याचे सातत्याने पुढे ठेवल्यामुळे  नक्की नाट्य क्षेत्रात क्रांती होऊन येथील कलावंत पुढे झळकतील . 

 
Top