उस्मानाबाद / प्रतिनिधी-

काँग्रेस पक्षाचे डिजिटल पद्धतीने सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. या अभियानास गती देण्यासंदर्भात उस्मानाबाद शहर काँग्रेसची आढावा बैठक आज काँग्रेस भवन उस्मानाबाद येथे संपन्न झाली. यावेळी डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी उपस्थितांना नोंदणी कशी करावी याबाबत माहिती दिली. शहरातील प्रभागनिहाय कार्यकर्त्यांनी नोंदणी करावी व आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी या नोंदणीच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले.

बैठकीत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, डिसीसी बँकेचे नूतन संचालक मेहबूब पटेल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, माजी सचिव जावेद काझी, माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे, जमेतुल कुरेश चे जिल्हाध्यक्ष हाजी उस्मान कुरेशी, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, माजी शहराध्यक्ष अशोकराव पवार, प्रा.वसंत मडके, ओबीसी विभागाचे धनंजय राऊत, मिलिंद गोवर्धन, अब्दुल लतीफ, सुरेंद्र पाटील, मूहिब शेख, मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, उपाध्यक्ष अहमद चाऊस, हबीब शेख, अभिजित देडे, मेहमूद शेख, राहुल लोखंडे, युवक काँग्रेसचे स्वप्नील शिंगाडे, कफिल सय्यद, प्रसन्न कथले, इम्रान हुसेनी, सौरव गायकवाड, अतुल चव्हाण, महादेव पेठे, संतोष पेठे, सारंग वडगावकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना काँग्रेसचे विचार, ध्येय-धोरणे समजावून सांगून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी व आगामी नगर परिषद निवडणूक एकजुटीने लढून उस्मानाबाद शहरात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यावे असे आवाहन केले.

बैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी केले तर उमेश राजेनिंबाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 
Top