उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लोकसभेत भारताचे प्रथम नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जे बेताल वक्तव्य केलं महाराष्ट्राच्या बाबतीत त्याचा जिल्हा काँग्रेस च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी  निषेध करण्यात आला.यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात “शर्म करो मोदी “सच बोलो मोदी,च्या जोरदार घोषणाबाजी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नाही तर हे आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील यांनी दिला आहे.

 या आंदोलनामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद ,कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे , जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील,तालुकाध्यक्ष रोहित पडवळ,उस्मानाबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे ,जिल्हा सचिव विनोद विर , माजी युवक जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर,विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड विश्वजित शिंदे , सेवादल युवक जिल्हा अध्यक्ष ॲड प्रणील डिकले , सरचिटणीस जावेद काझी, जीप सदस्य रफिक तांबोळी,  युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सलमान शेख, परंडा विधानसभा उपाध्यक्ष मोईज सय्यद, मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, कार्याधक्ष अहेमद चाऊस,रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ बाबाजानी, हबीब शेख, गुलाम दर्याजी,बालाजी माने, बालाजी नायकल,समाधान घाटशिळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

 
Top