तुलजापूर  /प्रतिनिधी-

  शहरातील २८ वर्षीय तरुणीवर तिच्याच जवळच्या नातलगाने  विनयभंग केल्याची घटना मंगळवार दि.८रोजी राञी  ९.३०व ाजल्याच्या सुमारास घडली. सदरील संशियत आरोपी पीढीतीचा सख्या भाऊ असल्याचे समजते. 

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, पीडीत  महिला आपल्या  आई-वडिलांच्या घरी राहत असुन  सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेचे आई-वडील हॉलमध्ये असताना पीडित  भांडी   ठेवण्यासाठी किचन रूममध्ये एकटी गेली होती . यावेळी आरोपीने  पीडित बहिणीच्या पाठीमागे जाऊन तिला वाईट हेतूने हाथ धरला व तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करून  मारहाण केली. 

  अशा प्रकारची पीडितीने  दिलेल्या फिर्यादीवरून  संशियत आरोपीच्या विरोधात  तुळजापूर पोलीस स्टेशन येथे   विनयभंगाचा गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे . गुन्ह्याचा पुढील तपास मुंजळे करत आहेत .


 
Top