उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील औद्योगिक वसाहतीत नळे निवास हौशी छंदी गायक मेलडी स्टार समुहाच्या वतीने स्वरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीत गायनातून श्रद्धांजली अर्पित करण्यात आले प्रथम प्रतिमेस उद्योजक संतोष शेटे यांनी  पुष्पहार घालून स्तभ राहुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

  याप्रसंगी समुह प्रवर्तक युवराज नळे , समन्वयक शेषनाथ वाघ,  विधीज्ञ दिपक पाटील मेंढेकर ,तौफीक शेख , शरद वडगावकर, धनंजय कुलकर्णी , सुधीर पवार, श्यामसुंदर भन्साळी, मुनीर शेख , नितीन भन्साळी यांनी गायनातून श्रद्धांजली वाहण्यात आली . प्रभाकर चोराखळीकर,मदन पवार,संभुदेव खटिंग उपस्थित होते .


 
Top