उस्मानाबाद (प्रतिनिधी)

 रूपामाता ॲग्रो गुळ पावडर प्रकल्पाचा चाचणी गळीत हंगाम मार्चअखेर होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मुख्य प्रवर्तक,ॲड.व्यंकटराव गुंड यांनी दिली. ह.भ.प.पांडुरंग लोमटे महाराज यांच्या उपस्थितीत ॲड.गुंड यांच्या अद्ययावत सोयी सुविधांनी तयार केलेल्या विधी आणि संपर्क कार्यालयाचे उद्घाटन समर्थ सभागृहामध्ये झाले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

सन 2004 साली रुपामाता अर्बनचे रोपटे लावले गेले. आज या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेच्या एकूण 18 शाखा कार्यरत आहेत. पाडोळी येथे गूळ पावडर निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे. त्यासोबतच रुपामाता दूध संकलन आणि दूध विक्री केंद्र सुरू आहेत. माजलगाव तालुक्यातील रोशनपुरी, तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा येथील सहकारी संस्था सहकाराबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही तीन वेगवेगळ्या शाखा, संस्था कार्यरत आहेत. 21 फेब्रुवारी रोजी ॲड.गुंड यांच्या विधि आणि संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. यानंतर बोलताना ॲड.गुंड म्हणाले की, रुपामाता परिवाराचा विस्तार झपाट्याने होत आहे.रूपामाता ॲग्रो गूळ पावडर कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम मार्चअखेर होईल, असे यावेळी  त्यांनी जाहीर केले.

याप्रसंगी ॲड.रवींद्र कदम, जिल्हा परिषद सदस्य माऊली राजगुरू, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, ॲड.कुदळे, लेखापरीक्षक प्रवीण प्रजापती दीपक भातभागे, ॲड.अजित गुंड, ॲड.शरद गुंड, रुपामाताचे संचालक शंकर गाडे, अजय नाईक, भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्ता सोनटक्के, ॲड.दुरुगकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपामाता मल्टीस्टेटचे मुख्याधिकारी बोधले यांनी केले तर आभार मिलिंद खांडेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला रुपामाता परिवारातील सदस्य आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

 
Top