उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील क्रांती चौक भिमनगर येथे अखिल भारतीय जीवा सेना महिला आघाडीच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी नंदा बनसोडे, सोनाया डांगे, जया बनसोडे, लता शिंगाडे,नागाई वाघमारे, अखिल भारतीय जीवा सेनेच्या महिला जिलाध्यक्षा राऊत ,  उस्मानाबाद शहर सचिव श्रीमती जीवमती सुरेखा वाघमारे,  अविनाश डांगे, अखिल भारतीय जीवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे, जिल्हा प्रवक्ते रवींद्र राऊत तथा  उस्मानाबाद शहराध्यक्ष हे उपस्थित होते. यावेळी  प्रवक्ते रवींद्र  राऊत यांनी उपस्थितांना माता रमाबाई यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या त्यागाविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.दरम्यान नागरिकांनी रमाबाई आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.

 
Top