उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 रथसप्तमी निमित्ताने सोमवार  दि. ०७  रोजी  श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरात रथ अलंकार महापूजा  मांडण्यात आली होती.  श्रीतुळजाभवानी मातेस दुग्धअभिषेक करण्यात आल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आले नंतर रथअलंकार महापुजा मांडण्यात आली देविजींचे रथात बसलेले रुप पाहुन भाविक धन्य धन्य होत होते.

ही पुजा मांडण्या बाबतीत  अशी आख्यायिका सांगितली जाते की,  :भगवान सूर्यनारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी  आपला रथ दिला.त्या प्रसंगाचीआठवण म्हणून     रथ अलंकार महापूजा बांधली (मांडली) जाते.अशी आख्यायिका सांगितली जाते    

 
Top