तुळजापूर / प्रतिनिधी-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत प्रथमेश प्रदीप हंगरगेकर याने १७ वा क्रमांक पटकावला आहे. त्याचा या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रथमेश हंगरगेकर याचे शालेय शिक्षण तुळजापूर व उस्मानाबाद येथे तर स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे झाले आहे. त्याचे पदव्युत्तर शिक्षण श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथे झाले आहे.

 
Top