उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बंडातात्या कराडकर यांनी महिला नेत्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्या बद्दल त्यांच्यावर कठोर कार्यवाही करणे बाबत निवेदन पोलिस अधिक्षकांना भाजपा महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आले.

बंडातात्या कराडकर यांनी महिला नेत्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्या बद्दल त्यांच्यावर कठोर कार्यवाही करणे बाबत निवेदन

 महाराष्ट्र सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात साताऱ्यात आंदोलन करताना बंडातात्या कराडकर यांनी माननीय पंकजाताई मुंडे आणि सुप्रियाताई सुळे यांच्या संदर्भात जी वक्तव्ये केली,  ती त्यांच्या सडलेल्या मानसिकतेची निदर्शक आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिला आहे, परंतु ते करताना त्यांनी सार्वजनिक जिवनातील स्त्रियांना टार्गेट करुन त्यांचे  चारीत्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेत्या पंकजाताई मुंडे व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर केलेल्या अशा वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे.

तरी त्यांच्यावर कठोर अशी कार्यवाही व्हावी ही या मागणीचे निवेदन भाजपा महिला मोर्चा उस्मानाबादच्या  वतीने पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले. 

 
Top