उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण भारत देशाची तसेच सांगीतिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी अशी हानी झालेली आहे ्‌

या गानकोकीळेस उस्मानाबाद येथील शनिवार संगीत मंडळाच्यावतीने दि ७/२/ २०२२ रोजी सांगीतिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी शनिवार संगीत मंडळाचे सदस्य उपस्थित होते सर्वप्रथम मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मुकुंदराव यास यांनी लतादीदी च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर सर्व सदस्यांनी लतादीदींच्या संगीत प्रवासावर कसा प्रभाव पाडला तसेच जडणघडणीमध्ये या गाण समृद्धीचा कसा सिंहाचा वाटा आहे याबाबत मनोगत व्यक्त केले

शनिवार संगीत मंडळाच्या  सदस्यांनी याप्रसंगी लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत गायलेल्या गाण्यांपैकी काही गाणी सादर करून लतादीदींना सांगीतिक श्रद्धांजली अर्पण केली

याप्रसंगी अरुण जोशी जयकुमार नायगावकर मुकुंदराव व्यास श्रीपाद देशपांडे विलास धर्म पी डी देशपांडे धनंजय वळसंगकर धनंजय देशपांडे सिद्धेश्वरप्रसाद जोशी डॉ श्रीकांत कवठेकर कालिदास म्हेत्रे व राहुल जोशी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुल जोशी यांनी केले

 
Top