तुळजापूर / प्रतिनिधी-  

भारतीय   युवा क्रिकेट संघाने नुकताच  विश्व वल्डकप जिंकला असुन हा चषक  पटकविण्यात सिंहाचा वाटा तिर्थक्षेञ तुळजापूर येथील उगवता क्रिकेट पटू राजवर्धन सुहास हंगरगेकर यांचा आहे.उस्मानाबाद जिल्हयाची ओळख हवापाणी तुळजाभवानी अशी आजपर्यत होती परंतु हर्षवर्धन आपल्या जिद्दीचा जोरावर  क्रिकेट मध्ये ही उस्मानाबाद जिल्हयाची ओळख भारतभर करुन दिली.

या युवा क्रिकेट पटूच बालपण श्रीतुळजाभवानी मंदीर समोर असणाऱ्या आर्यचौकात गेले .लहानपणा पासुन खेळाची आवड असणारा राजवर्धन कुठल्याही प्रशिक्षणविना अनेक वर्ष क्रिकेट खेळत राहिला. उस्मानाबाद जिल्हा तसा मागासलेला जिल्हा येथे आंतरराष्ट्रीय खेळात चमकण्यासाठी सोयीसुविधा नसताना टर्फविकेट नसताना  मातीचा  असणाऱ्या कामचलावु  मैदानावर सराव करुन त्यांने जिद्द चिकाटी जोरावर भारताचा १९वर्षाखालील क्रिकेट संघात समाविष्ट होवुन त्यात चमकदार कामगिरी करुन भारताला विश्वचषक मिळवुन देवुन उस्मानाबाद जिल्हयाची हवापाणी तुळजाभवानी या ओळखी बरोबरच क्रिकेट पटू चा जिल्हा अशी ओळख देशाला करुन दिली.

 युवा अष्टपैलु क्रिकेट पटू राजवर्धन हा  तुळजापूरचे माजी . आ . कै साहेबराव हंगरगेकर यांचे नातु कै .सुहास ( नाना ) हंगरगेकर यांचे चिरंजीव क्रिकेट पटू राजवर्धन हंगरगेकर यांने  क्रिकेट चा श्रीगणेशा तुळजापूरात  गिरवला  नंतर तो शिक्षणासाठी उस्मानाबादला गेला तिथे त्याने स्थानिक  मार्गदर्शकाखाली क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले.

 याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला यात राजवर्धनचे वडील सुहास हंगरगेकर यांना कोरोना झाल्याने  ते मयत झाले.वडीलाचे छाञ हरपले तरीही हर्षवर्धनने एकाग्रतेने क्रिकेट वर लक्ष केंद्रित केले  त्याची  १९ वयोगटातुन विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाली.  या स्पर्धेत वेगवान गोलदांज म्हणून पुढे आला व संकट काळी चौकर छक्याची बरसात करुन  अष्टपैलु कामगिरी करीत  प्रत्येक सामन्यात  भारताला विजय मिळवून दिला.व अंतिम सामान्यात ही चमकदार कामगिरी करत या  युवा क्रिकेट पटूनी विश्वचषक मिळवुन दिला .


 
Top