उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील येरमाळा येथील अण्णाभाऊ साठे नगर आणि सिद्धार्थ नगर येथील बहुजन समाजाचे वास्तव्य धोक्यात आणणाऱ्या हैदराबाद येथील मेगा कन्स्ट्रक्शनवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे.या बाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना लहुजी शक्ती सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही वस्त्यांमधील रहिवाशांची अडचण ध्यानात घेऊन बांधकाम करावे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास नागरिक महामार्गावर आपले परिवारासह ठिय्या आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.   निवेदनावर लहुजी शक्‍ती सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य रोहित खलसे,येरमाळा येथील अध्यक्ष सागर कसबे,युवक शहराध्यक्ष महेश कसबे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मोरे आणि जिल्हा संपर्कप्रमुख निखिल चांदणे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 
Top