उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सर्वसामान्यांचे जीवनमान खऱ्या अर्थाने उंचावण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी ठेवलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर असून नव नियुक्त पदाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

भाजपची उस्मानाबाद शहर कार्यकारणी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात नव नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देताना आमदार पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नितिन काळे, बुद्धीजिवी प्रकोष्ठचे दत्ताभाऊ कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित हाेते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नविन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

कार्यक्रमात जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, ॲड.खंडेराव चौरे, कैलास शिंदे, हर्षवर्धन चालुक्य,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे, सुजित साळुंके उपस्थित होते.

Top