उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक असोसिएशन चे नूतन सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांच्या समवेत आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक तथा अर्जुन पुरस्कार प्राप्त श्री काका पवार, ऑलम्पिक संघटना सदस्य तथा राज्य वुशु संघटनेचे सचिव श्री सोपान कटके,व्हॉलीबॉल राज्य संघटनेचे सहसचिव श्री निलेश जगताप,राज्य शासनाचे कुस्ती प्रशिक्षक श्री राजाभाऊ कोळी,राज्य ऑलम्पिक संघटनेचे प्रशासकीय अधिकारी श्री राजेंद्र घुले, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त शिवाजी वानखेडे यांनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले व राज्य कोविड मुक्त व्हावे व राज्यातील सर्व खेळाडू व क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस यावे असे साकडे घातले

 यावेळी मंदिर संस्थान,जिल्हा अॅथलेटिक्स,व्हॉलीबॉल, फुटबॉल, बेसबॉल,बॉलबॅडमिंटन,खेळाडू, क्रीडाप्रेमी व जिल्ह्यातील विविध खेळ संघटनांनी सर्व पदाधिकारी यांनी शाल,श्रीफळ व देवीची प्रतिमा देऊन सन्मान केला

यावेळी श्री शिरगावकर यांनी यापुढे जिल्ह्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन तसेच राज्य-राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू,प्रशिक्षक,राज्यातील क्रीडा संकुल यांना राज्य शासनाच्या वतीने विविध प्रकारची मदत राज्य ऑलम्पिक संघटना नक्कीच मिळवून देऊ असे आश्वासन दिले तसेच अर्जुनवीर मा.श्री काका पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठवाड्यातील व उस्मानाबाद जिल्ह्यातील व्हॉलीबॉल, कुस्ती अथेलेटिक्स, खो-खो व इतर खेळांचा खूप मोठा इतिहास आहे व तो असाच अबाधित राहील असा विश्वास व्यक्त केला, व भविष्यात जिल्ह्यातील क्रीडा विकासासाठी येणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल असा विश्वास व्यक्त केला

या सर्व मान्यवरांचा सन्मान शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री अंकुश पाटील,जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे संजय दादा देशमुख, जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले, अॅथलेटिक्स प्रशिक्षक तथा जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री राजेश बिलकुले,जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप गंगणे, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव जावेद शेख,अॅथलेटिक्स प्रशिक्षक श्री अजिंक्य वराळे, व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक शैलेश पाचभाई, अनिल भोसले, महेश गंगणे,सॉफ्टटेनिस चे प्रशिक्षक संजय नागरे व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते

 
Top