परंडा / प्रतिनिधी : - 

कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे व कुलवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर परिवार व भक्तीशक्ती सार्व शिवजन्मोत्सव सोहळा समिती तालुक्यातील जवळा (नि.) आयोजित रक्तदान शिबिरात153 जणांनी रक्तदान केले.

 उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माध्यमिक चे उपशिक्षणाधिकारी रावसाहेब मिरगणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिमा नाना वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून परांडा प स चे गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे हे होते.

   रक्तदान चळवळ उभी राहावी म्हणून कर्मवीर परिवारातील शिक्षक गेली आठ वर्षांपासून ही शिबिरे आयोजित करतात. या शिबिरात रक्तदाब, हिमोग्लोबिन आदींची तपासणी करून रक्तदात्यांस रक्तदान याविषयीचे गैरसमज दूर करण्यात आले.

  सर्व रक्तदात्यांचा कर्मवीर परिवरामार्फत शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.

या शिबिरासअमोल कातुरे, मिनिनाथ राऊत, प्रथमेश गवारे, विकास रोडे, विकास कारकर,  जगदिश गवारे, बाबासाहेब सांगडे, कुंडलीक गवारे,युवराज कातुरे, साजन कारकर,भिमा नाना वाघमारे, यांच्या सह गावातील युवक वर्ग यांचे सहकार्य लाभले.यावेळी भुम परंडा तालुक्यातील शिक्षकवृंद तसेच कर्मवीर परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते

 यावेळी गणेश गवारे,बबलु सांगडे, मंजुर मुलाणी, रामदास सांगडे, डॉ सचिन गुटाळ,धनंजय कारकर,निता कारकर, बाबासाहेब गवारे, दत्तात्रय सांगडे,आदी युवकांनी रक्तदान केले.


 
Top