उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती निमित्ताने  दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी गावातील शिवप्रेमीचा सत्कार करण्यात आला दरम्यान कोंड येथील मुस्लिम मावळा अनिस मुलाणी याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मराठी गित गायले आहे त्याचा विशेष सत्कार करुन त्याला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे जंगी आयोजन गावचे माजी उप सरपंच त्र्यंबक पंढरी भोसले यांनी सर्व उपस्थीतांना फेटे बांधून सत्कार केला यावेळी गावातील मुस्लिम बांधवांना फेटे बांधून त्यांचा प्रथम सत्कार केला.

यावेळी गावातील सर्व जाती धर्मातील  शिवप्रेमी यावेळी उपस्थीत होते.

 
Top