तुळजापूर  / प्रतिनिधी-

- शहरातील तुळजापूर खुर्द भागातील माळी गल्ली मधील  नगरपरिषदच्या असणाऱ्या  शौचालयांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तरी सदरील या शौचालयाची स्वच्छता करण्याची मागणी या भागातील रहिवाशांन मधुन केली जात आहे.

 तुळजापूर खुर्द भागातील माळी गल्लीत येथील शौचालयाचा वापर तीनशे च्या आसपास   नागरिक करतात परंतु यांच्या स्वच्छते कडे गेली अनेक महिन्या पासुन दुर्लक्ष केले जात असल्याने  नागरिक  इकडे फिरकणासे झाले आहेत त्यामुळे स्वच्छ वार्ड अभियानचा येथे फज्जा उडाला आहे.

 

 
Top