तुळजापूर/ प्रतिनिधी- 

कर्जत जामखेडचे आमदार रोहित राजेंद्र पवार यांनी शनिवार दि.२२ रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात  येवुन श्रीतुळजाभवानी मातेस कुलधर्मकुलाचार  केला.  कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये विजय मिळवुन दिल्याच्या प्रित्यर्थ कुलदैवत श्री तुळजाभवानी  देवीला साडी चोळी अर्पण करुन  ओटी भरुन,नैवेद्य   दाखवुन देवि चरणी नतमस्कतक होवुध आभार मानले.

 यावेळी  मंहत वाकोजीबुवा, गुरु तुकोजीबुवा, पवार कुंटुंबियांचे पारंपारिक पुजारी श्री सुदर्शन पवार  व सोमनाथ पवार, गोरक्षनाथ पवार, कृष्णा पवार आदी उपस्थितीत होते. देवीदर्शना नंतर मंदीर समितीच्या वतीने प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे यांनी त्यांच्या सत्कार केला. यावेळी गोकुळ शिंदे , संदीप गंगणे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थितीत होते.


 
Top